आरक्षण ; मराठा विद्यार्थी घेणार राज ठाकरेंची भेट
माय नगर टीम
मराठा समाजाचे विध्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून या बैठकीत तोडगा न निघाल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विध्यार्थ्याना मराठा आरक्षण नाही असा निर्णय दिला होता. दरम्यान मराठा समाजाचे विध्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने आक्रमक झाले आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारी मराठा समाजाचे विध्यार्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही तर मनसे अध्यक्ष राज ठकारे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment