अयोध्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली -
सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी मध्यस्थ कमिटीला 15 ऑगस्टपर्यंची मुदत वाढ दिली आहे. तत्पूर्वी कमिटीने आपला अहवाल एका बंद लिफाफ्यात कोर्टाकडे सुपु्र्द केला होता. हे प्रकरण मध्यस्थ कमिटीकडे गेल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच यावर सुनावणी झाली. यादरम्यान कमिटीने प्रकरणाबाबत बातचीत करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंची मुदत मागितली होती. सुप्रीम कोर्टाने ती मान्य केली आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांची एक समिती या प्रकरणाची सुनावणी करत आहे. या समितीत न्यायाधीश एसए बोबडे, न्या.डी.वाय.चंद्रचूड़, न्या.अशोक भूषण आणि न्या. एस.ए. नजीर यांचा समावेश आहे.
Post a Comment