जुगार खेळताना माजी नगरसेवकासह पाच जणांना पकडले



माय नगर टीम

तिरट नावाचा जुगार खेळताना माजी नगरसेवक सुनील सर्जेराव कोतकर यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 72 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.ना. नितीन शिवाजी शिंदे वय-३२, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, केडगाव परिसरातील मोतीनगर येथील आरसीसी ग्राऊंडसमोर एका पडक्या खोलीत बाजीराव यशवंत येवले, वय-५४, रा.सुतार गल्ली, केडगाव अ.नगर, मच्छिंद्र त्रिंबक शेळके, वय-३९, रा.धानोरा तालुका आष्टी, जिल्हा बीड, बाबासाहेब शाहुराव गारुडकर वय-४०, अंबिका हॉटेलसमोर केडगाव, अहमदनगर, पोपट शहाजी सदाफळे, वय-४०,रा.चिचोंडी पाटील, तालुका जिल्हा नगर. सुनिल सर्जेराव कोतकर वय-४२, रा.नगर पुणे रोड केडगाव अहमदनगर, हे आज सायंकाळी पाच तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 82 हजार 300 रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post