आज लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा : ५९ जागांसाठी मतदान


माय नगर टीम
लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यात आज (रविवारी) ५९ जागांसाठी मतदान होत आहे. ९७९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणारा हा टप्पा आहे. उत्तर प्रदेशातील १४, मध्य प्रदेशातील ८, बिहारमधील ८, पश्चिम बंगालमधील ८, हरियाणातील सर्व १० आणि दिल्लीतील सर्व ७ जागांवर मतदान होणार आहे. भाजपसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे.

२०१४ मध्ये दिल्लीतील सातही जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत होत असून मतविभाजनाचा फायदा कुणाला होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमधील १४ जागांवर मतदान होत असून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची परीक्षा घेणारा हा टप्पा आहे. भाजप, काँग्रेस आणि सप-बसप आघाडी अशी तिरंगी लढत या १४ जागांवर होत आहे.

प्रमुख उमेदवार

काँग्रेस नेते दिग्विजय सिह, भाजपाच्या सांध्वी प्रज्ञा सिह, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री मनेका गांधी, हर्षवर्धन, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, बॉक्सर विजेंदर सिंग, केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, नरेंद्रसिंह तोमर, रवि शंकर प्रसाद, रामकृपाल यादव, अश्विनीकुमार चौबे, राजकुमार सिंह, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post