मनपाचा भोंगळ कारभार ; आगरकर मळ्यात पाणीच पाणी




माय नगर टीम

नगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील पाण्याने तळ गाठला असतांना आज सकाळी आगरकर मळा परिसरातील पाणी टाकीचा ऑल फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. महापालिका करचार्यांचा भोंगळ कारभार यास जबाबदार असून आगरकर मळा परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

आज सकाळीं पाण्याच्या टाकीचा ऑल फुटला.

व्हॉल फुटल्याने सुमारे 10 लाख लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले. उशिरापर्यंत महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने किंवा नगरसेवकाने याची दखल घेतली नाही.

परिसरातील नागरिकांना ही पर्वणी ठरली. वाया जाणाऱ्या पाण्यात आपल्या गाड्या धुवून टाकल्या तर काही गृहिनीनि पाण्याचे हांडे भरून घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post