माय नगर टीम
निघोज येथील ‘ऑनर किलिंग’चा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढविली. तपासातून दोनच दिवसांत दिवशी गुन्ह्याला कलाटणी मिळाली आहे. फिर्यादी पती मंगेश चंद्रकांत रणसिंग (रा. निघोज, ता. पारनेर) यानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. आता पोलिसांकडून त्याला अटक केले जाणार आहे. त्याच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रूख्मिणी व तिचा पती मंगेश रणसिंग यांनी प्रेमविवाह केला म्हणून रूख्मिणीचे वडील, काका व मामा यांनी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची फिर्याद मंगेश याने दिली होती. रूख्मिणी हिने पोलिसांना दिलेल्या मृत्यूपूर्वी जबाबातही काका, मामा व वडीलांनी पेट्रेाल ओतून दोघांना पेटवून देण्यात आल्याचे सांगितले होते. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रुख्मिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे निघोज येथे ‘ऑनर किलिंग’ झाल्याच्या वृत्ताचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले. परंतु या प्रकरणाने कलाटणी घेतली असून मंगेशच रुख्मिणीचा मारेकरी! असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
Post a Comment