छावणी चालकांना जीएसटी लागणार नाही; टॅग प्रशिक्षणाकडे चालकांची पाठ
माय नगर वेब टीम
जिल्हा प्रशासनाने 15 मे पासून सर्व छावणीतील जनावरांना टॅग लावणे बंधनकारक केले आहेत. तसेच उद्यापासून सर्व छावणी चालकांना मोबाईल वरून जनावरांची दैनंदिन माहिती पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अवघ्या एका दिवसात जिल्ह्यातील 493 छावण्यांतील एकूण 3 लाख 9 हजार जनावरांना तुम्ही टॅग कसे लावणार, असा प्रश्न खुद्द पालकमंत्र्यांनीच उपस्थित केला. टॅग लावण्यास संबंधित छावणीचालकांना मुदतवाढ द्यावी लागेल, याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सुचना दिल्या.
नगर येथील जिल्हापरिषद पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. दरम्यान छावणीचालकांना जीएसटी लागणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment