राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा सावेडीत राडा; पोलिसालाच धुतले


माय नगर वेब टीम

अहमदनगर- पाईपलाईन रोडवर पोलिसाला लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह सात ते आठ जणांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के (वय ३०) यांना मारहाण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात पोलीस गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक सुनील त्रिंबके, अमित गाडे व प्रताप गायकवाड यांच्यासह आणखी चार ते पाच जणांनी आमच्या विरोधात केस का केली? अशी विचारणा करत पांडुरंग म्हस्के यांना त्यांच्या घराजवळ तसेच स्वत:च्या ऑफीसमध्ये नेउन लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post