दुष्काळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
माय नगर टीम
नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील शेतकरी शशिकांत सुखदेव चोभे यांनी सततच्या नापिकीला व दुष्काळाला कंटाळून विषय घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
शशिकांत यांनी तीन दिवसापूर्वी शेतात जाऊन बुटेक्स नावाचे विषारी औषध घेतलं त्यांच्यावर नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी त्यांचे वय 35 वर्ष होते. मागील वर्षापासून पडणारा दुष्काळ, पाणीटंचाई या सर्व त्रासाला कंटाळून त्यांनी औषध घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी, आई, वडील,एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
Post a Comment