ना. विजय औटी यांची सोशल मीडियावर बदनामी; सुप्यात गुन्हा
माय नगर वेब टीम
पारनेर - पारनेर तालुक्यातील रुई छञपती येथील युवक संदिप साबळे याने नामदार विजय औटी यांना संबोधुन सोशल मिडीयावरील फेसबुक वर रुई छञपती येथील छावण्यांवर घोटाऴे चालु आहेत हे दिसत नाही का ? अशी पोस्ट टाकली. सोशल मीडियावर बदनामी केल्यामुळे खुद्द नामदार विजय औटी यांनी शनिवार दि.११ रोजी रात्री १० वाजता सुपा पोलिस स्टेशनला संदिप साबऴे विरुध्द फिर्याद दिली आहे. त्यावरून साबळे यांच्या विरोधात सुपा पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कुमार सोने हे करत आहेत.
Post a Comment