नगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या आर्वी गावात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने विभागाच्या पथकाने आज भिमा नदी पात्रातील अवैध वाळू उपसावर कारवाई करत सुमारे 1 कोटी 43 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपीमध्ये वजीर सुरज शेख (वय 28, रा.कुंभारगल्ली, दौड), सुरेश उंडे (वय 27, रा.आर्वी, ता.श्रीगोंदा), अजित कुसळकर (वय 22, रा.ढोकराई, ता.श्रीगोंदा) यांना अटक केली असून पळूण गेलेल्यामध्ये दादा गिरमकर (रा.आर्वी,) अली सय्यद शेख (रा.दौड), मंगेश वराळकर (रा.श्रीगोंदा) यांचा समावेश आहे.
Post a Comment