वॉटर कप स्पर्धेतील गावांना जलसंधारण कामाकरिता इंधन निधी



माय नगर टीम

मृद व जलसंधारण विभागाने जिल्‍हाधिकारी यांना जलयुक्‍त शिवार अभियान मधून वॉटर कप स्‍पर्धेसाठी सन 2019-20 या वर्षात सहभागी होणा-या गावांना मृद व जलसंधारणा कामा‍करिता इंधनासाठी निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.

राज्‍यात वॉटर कप स्‍पर्धा सन 2016- 17 पासून आयोजित करण्‍यात येत असून सन 2019- 20 मध्‍ये 24 जिल्‍हयातील 76 तालुक्‍यात स्‍पर्धा घेण्‍यात येत आहे. सन 2018-19 च्‍या धर्तीवर सन 2019-20 वॉटर कप स्‍पर्धेत जी गावे सहभागी होऊन मृद व जलसंधारणाची दुष्‍काळ प्रतिबंधक उपायायोजनांची कामे श्रमदानाद्वारे करतील अशा गावांना प्रोत्‍साहन म्‍हणून मशीनद्वारे करण्‍यात येणा-या कामाकरिता इंधनाच्‍या खर्चासाठी प्रति गाव रुपये 1 लाख 50 हजार रुपये मर्यादेत निधी जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या सन 2019-20 या आर्थिक वर्षात उपलब्‍ध होणा-या निधीतून देण्‍यात येणार आहे.

लोकसहभागातून झालेल्‍या कामांचा तसेच मशीनद्वारे झालेल्‍या कामांचा तपशील स्‍वतंत्रपणे ठेवण्‍यात येणार आहे. ग्रामपंचायतीला उलपब्‍ध करुन देण्‍यात येणारा निधी, खर्च करण्‍याची कार्यपध्‍दती व खर्चाच्‍या लेखे ठेवण्‍याच्‍या कार्यपध्‍दती जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या जिल्‍हास्‍तरीय समितीने निश्चित करावी.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post