नगर तालुक्यातील रांजणी या गावात पाणी फाऊण्डेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या श्रमदानास हातभार लावून सिनेअभिनेत्री व शिवसंग्राम पक्षाची महिला जिल्हाध्यक्षा दिपाली भोसले - सय्यद यांनी गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली. गावातील काम पाहून हे गाव दत्तक घेतले. यावेळी सरपंच बाळासाहेब चेमटे, सह्याद्री मल्टी निधी बँकेचे अध्यक्ष संदीप थोरात, संगिता लिंपणे, शुभांगी थोरात, कांता बोठे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाणी फाऊण्डेशनच्या स्पर्धेत बक्षीस मिळविण्याकरिता श्रमदान करू नका तर स्वत: व आपल्या कुंटुबाकरीता श्रमदान करा. कोणाकरीता काही करू नका तर आपल्या भावी पिढीच्या भविष्याचा विचार करा तुम्ही एकत्र आला तरच तुमचे गाव सुधारेल. गावाची पाण्याची समस्या मिटेल तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल करण्याकरीता यांची अत्यंत गरज आहे. ही गरज ओळखून प्रत्येकाने एक तरी फावड मारावे तरच उदयाचा काळ चांगला राहणार आहे. जे श्रमाचे दान तुम्ही करत आहात त्याला लोकसहभागाची जोड दया, तरच गावाचा विकास होण्यास मदत होईल, असे मत प्रतिपादन सिनेअभिनेत्री व शिवसंग्राम पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा दिपाली भोसले सय्यद यांनी व्यक्त केले.
नगर तालुययातील रांजणी या गावात पाणी ौंडेशनचा चालु असलेला श्रदान प्रकल्पाला सिनेअभिनेत्री व शिवसंग्रा पक्षाची हिला जिल्हाध्यक्षा दिपाली भोसले यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ, तरुण वर्ग व गावातील श्रमदान करण्यास आलेली सव महिला व पुरुष वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने व पाणी फाऊण्डेशनच्या टीम, बास्को ग्रामीण विकास संस्थेचे अधिकारी व टाटा पावर चे अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment