पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अण्णांची साक्ष
माय नगर टीम :
राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अण्णांच्या साक्षीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी, समाजसेवक अण्णा हजारे यांना साक्षीसाठी बोलाविण्यासाठी सीबीआयने कोर्टात अर्ज दिला होता. मात्र या हत्याकांडातील आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी अण्णा हजारे यांची साक्ष आवश्यक नसून कोर्टासमोर त्यांना बोलवून साक्ष घेऊ नये, असा अर्ज देत त्याला विरोध केला होता.
तो अर्ज सेशन कोर्टाने मान्य केल्यानंतर पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या हत्याकांडाची नियमित सुनावणी १४ मे रोजी मुंबई सत्र न्यायालयात होणार आहे.
Post a Comment