संगणक प्रशिक्षण कार्यक्रमावर छावणी चालकांनी बहिष्कार


माय नगर टीम

जनावरांच्या छावणीत शासन निर्णयाप्रमाणे 15 मे नंतर प्रत्येक जनावरांना टॅग, बारकोड करून दररोज अ‍ॅड्राईड मोबाईलमध्ये स्कॅन करण्याचे काम किचकट, वेळखाऊ असल्याने ते काम करण्यास पाथर्डी तालुक्यातील छावणी चालकांनी स्पष्ट नकार दिला आहे. सदर अट शिथील करण्यात यावी अन्यथा 15 मे नंतर छावण्या बंद करण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी तालुक्यातील छावणी चालकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जनावरांच्या नोंदी करण्याच्या संगणक प्रशिक्षण कार्यक्रमावर छावणी चालकांनी बहिष्कार टाकला.

दि. 4 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार छावण्यातील जनावरांची दैनंदिन संख्या मोजण्यासाठी 15 मे पासून प्रत्येक जनावरांना टॅग, बारकोड व स्कॅन करणे बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काल प्रशासनातर्फे तहसिल कार्यालयात सकाळी छावणीचालक संस्थेच्या प्रतिनिधीसाठी संगणक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post