बीडमध्ये छावण्यांत जनावर घोटाळा!
माय नगर टीम
चारा छावण्यातून जनावरांची संख्या बोगस दाखवून मलिदा खाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री बीड व आष्टी तालुक्यात ३६ छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आली. कोल्हारवाडी (ता.बीड) येथील छावणीत ७४४ जनावरे कमी आढळल्याने ही छावणीच रद्द करण्यात आली.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व शोभा जाधव यांनी बीड तालुक्यातील १६ छावण्या, तर आष्टीतील २० छावण्या बीड उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, शोभा ठाकूर, गणेश महाडिक यांनी तपासल्या.
जिल्ह्यात ९३१ छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी ६०० छावण्या सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक १८६ छावण्या बीड तालुक्यात, तर १८५ चारा छावण्या आष्टी तालुक्यात आहेत.
Post a Comment