अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या अनेक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली.
या उपाययोजनांचे स्वरूप :-
जिल्ह्यातील १३ तालुक्यात ७७२ टँकरने पाणीपुरवठा सुरु
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात ४ नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती.
५४ विहिरींचे अधिग्रहण
पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १०.४९ कोटी रुपयांच्या थकित वीज देयकाची रक्कम भरून पाणी पुरवठा सुरळित करण्यात आला.
जिल्ह्यात ७ तालुक्यात ४९३ शासकीय चारा छावण्या. यामध्ये २ लाख ६७ हजार ५७४ मोठी तर ४१ हजार ९१७ लहान अशी मिळून ३ लाख ०९ हजार ४९१ जनावरे दाखल.
दुष्काळ जाहीर केलेल्या ११ तालुक्यातील १२७५ गावातील ६ लाख ३६ हजार ७९० शेतकऱ्यांना ४००.५४ कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा.
जिल्हाधिकारी अहमदनगर यांना चारा चालकांची देयके अदा करण्यासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी वितरित.
जिल्ह्यातील एकूण ३ लाख ४९ हजार २९२ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसानभरपाई पोटी १४७.१५ कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यापैकी ९० कोटी रुपयांची रक्कम १ लाख ६५ हजार ४४९ शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २.७२ लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ५८ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये या प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी ११.५६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८८६ कामे सुरु. त्यावर ७५१२ मजुरांची उपस्थिती.
Post a Comment