अपाची हवाई ताफ्यात एंट्री








नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक अपाची एंट्री मारली आहे. जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर हे हवाई दलात दाखल झाल्याने भारताची मान उंच झाली आहे. अमेरिकेतील अ‍ॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकार्‍यांकडे अपाची हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले. भारताने अमेरिकेबरोबर 22 अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे.

अ‍ॅरीझोनामध्ये अपाची हेलिकॉप्टरचे प्रमुख उत्पादन केंद्र आहे. अपाची हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये या हेलिकॉप्टर्सचा तळ असेल.

भारत आणि अमेरिकेत सप्टेंबर 2015 मध्ये 13,952 कोटी रुपयांचा अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता. भारताला मार्च 2020 पर्यंत 22 अपाची हेलिकॉप्टर मिळणार आहेत. या हेलिकॉप्टरची पहिली बॅच जुलैमध्ये भारतीय हवाई दलाला मिळेल. अलबामामधील अमेरिकन लष्कराच्या तळावर सध्या वैमानिक आणि अन्य क्रू मेंबर्सचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post