दुष्काळ निवारण व टंचाई आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
माय नगर टीम
मुंबई - राज्यातील दुष्काळ निवारण व टंचाई आराखड्याची अंमलबजावणीसाठी पालक सचिवांना तातडीने जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पालक सचिवांनी जिल्हा दौरे करुन 21 मे पर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.
दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.
तसेच राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे 48 तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनास आदेश दिले.
Post a Comment