माय नगर वेब टीम
वय हा फक्त एक आकडा असतो हे अभिनेत्री सनी लिओनीच्या सौंदयाकडे बघून लक्षात येतं. बॉलिवूडमधील प्रथितयश अभिनेत्रीबरोबरच ती तीन मुलांची आईसुद्धा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वाढदिवस साजरा करण्याच्या तिच्या कल्पनांबद्दल सांगितले. “माझा वाढदिवस मी कायमच कुटुंबासोबत साजरा करते. यावर्षी सुद्धा मी डॅनियल आणि माझ्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करणार आहे” असं तिने सांगितलं. “माझे सगळे कुटुंबीय आणि जवळचे मित्र माझ्या वाढदिवसाला माझ्यासोबत आहेत याहून जास्त मला काही नको. सगळ्यांसोबत रात्री एकत्र जेवणं हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन आहे.” असंही ती म्हणाली. “डॅनियल नेहमीच माझ्या वाढदिवसाला काहीतरी सरप्राईज प्लॅन करतो. खरंतर मला खास महत्त्व देण्यासाठी त्याला वाढदिवसाची गरज नसते, तो इतरवेळी सुद्धा मला सरप्राईज देत असतो.” असं तिने सांगितलं.
२०११ साली ‘बिग बॉस’ मधून सनीने हिंदी टिव्हीसृष्टीत पदार्पण केलं. सनी आणि तिचा नवरा डॅनियल यांच्या गोड नात्याची कायमच चर्चा होत असते. वाढदिवसानिमित्त सनीचा नवरा डॅनियल वेबरने इंस्टाग्रामवर सनीसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. “पोस्ट लिहितांना आता माझ्या मनात खूप गोष्टी येत आहेत. त्या सगळ्याच एका पोस्टमध्ये लिहिणं अशक्य आहे. मी कायमच तुला स्वतःपेक्षा इतरांसाठी गोष्टी करतांना पाहिलं आहे. आतापर्यंत आपण स्वतः निवडलेल्या मार्गांनी एकत्र प्रवास केला आहे. माझ्या आयुष्यातली तू सगळ्यात सुंदर स्त्री आणि एक उत्तम माणूस आहेस.” असं म्हणत डॅनियलने सनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment