मुंबईच चॅम्पियन



माय नगर टीम
हैदराबाद - आयपीएलच्या अंतिम लढतीत चेन्नई सुपरकिंग्जला केवळ १ धावेने पराभूत करत मुंबई इंडियन्सने विक्रमी चौथ्यांदा आयपीएल अजिंक्यपद मिळवले. मुंबईविरुद्ध १५० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई संघाच्या शेन वॉटसनने सर्वाधिक ८० धावा केल्या. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पाच किताब मिळवणारा पहिला खेळाडू ठरला.



राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ रविवारी यंदाच्या १२ व्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीगच्या किताबाचा मानकरी ठरला. मुंबई इंडियन्सने करिअरमध्ये चाैथ्यांदा अायपीएलमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. यासह मुंबईच्या नावे सर्वाधिक किताब जिंकण्याच्या कामगिरीची नाेंद झाली.


राेहितच्या मुंबई इंडियन्स संघाने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धाेनीच्या टीमचा १ धावेने पराभव केला. यापेर्वी २०१७ मध्येही मुंबई इंडियन्सने असा राेमहर्षक विजय संपादन केला हाेत. त्या वेळी धाेनी हा रायझिंग पुणे सुपरजायंट्स टीमचा कर्णधार हाेता. त्या वेळीही मुंबईने असा पराक्रम गाजवला हाेता.


आता मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपरकिंग्ज संघाला ७ गड्यांच्या माेबदल्यात १४८ धावांपर्यंत मजल मारता आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post