सरकारने मराठा तरुणांची फसवणूक केली - राज ठाकरे


माय नगर वेब टीम

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदमध्ये राज ठाकरे यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली. दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केले. २९ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागत असतील तर या सरकारनं काय कामं केली असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.

दरम्यान, सरकार जरी कुणाचं असलं तरी चुकीच्या गोष्टींवर टीका व्हावी असे राज ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, या सरकारने मराठा तरुण-तरुणींची फसवणुक केली आहे. मराठा आरक्षण मिळालं म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा असे राज ठाकरे यांनी सांगितले. सरकारने खेळ करुन ठेवलाय राजकारणाचा. हे मुलं स्वप्न पाहतात अॅडमिशनची. सरकारने या मुलांची फसवणुक करायची होते. सरकारकडून काही होणार नव्हते हे माहिती होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी म्हणजे देश नव्हे. देशभक्तीचे सर्टिफिकेट त्यांनी नाही वाटायची. नवाज शरिफांना केक भरवताचा होता त्यावेळी देशभक्ती काय आणि देशद्रोही काय हे त्यांनी ठरवायचे होते अशी टीका राज ठाकरे यांनी केली. दहशतवादी हा दहशतवादी असतो त्याचा मुस्लिम आणि हिंदू असे काही नसते. जर तुम्हाला माहिती असेल हा दहशतवादी आहे तर त्याला तिथल्या तिथे ठेचले पाहिजे. कृती न करता फक्त वाद घालायचे आणि लोकांची माथी भडकवत बसवायची.


कोणतंही सरकार आले तर दहशतवाद हा ठेचला पाहिजे त्याचे राजकारण का केले जाते. नरेंद्र मोदी यांनी या देशाला जी स्वप्न दाखवली, जे वचन दिले त्याबद्दल ते काहीच का बोलत नाहीत असा सवाल राज यांनी विचारला आहे. या बद्दल ते का काहीच बोलत नाहीत. पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांचा राजकारणाशी काय संबंध आहे. एअरफोर्सने काय करायचे हे पंतप्रधान ठरवणार? काय चालवले काय आहे. ही काय थट्टा लावली आहे. यामुळे आपल्या देशाचे बाहेर हसू होत आहे, असे राज यांनी सांगितले.

महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना शहरामध्ये स्टॉल त्यांचे उभारुन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली. मग त्या आंब्याने काय घोडे मारले होते असा सवाल राज यांनी केला आहे. शेतकऱ्यांना शहरामध्ये चार गोष्टी कमवत असतील तर त्यात काय झाले. त्यांना विरोध काय करायचा आहे. भलं शेतकऱ्यांचे होते यामध्ये पक्षीय राजकारण का केले जातेय. आंबा विक्रीचा पहिला अधिकार हा शेतकऱ्यांचा आहे. ठाण्यातल्या मनसे-भाजप आंबा वादावर राज ठाकरे यांनी स्पष्टिकरण दिले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post