छावण्यातील अटी शिथिल करा, अनुदान वाढावा- राष्ट्रवादी
माय नगर टीम
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता व दुष्काळाची भीषणता दिवसंदिवस वाढत असून, पाणी व चार्या अभावी शेतकर्यांपुढे पशुधन वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. यासाठी जनावरांच्या छावण्या आधार ठरत असून, छावण्या मंजुरीकरिता शासनाने तब्बल 48 अटींची पुर्तता करण्याची अट शिथिल करावी, स्थानिक अधिकार्यांना परिस्थितीनुसार अटी, शर्ती आंशिक बदल करण्यास परवानगी द्यावी, छावणी चालकांना जनावरे सांभाळण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने अनुदानात वाढ करावी तसेच मागील बीले तातडीने अदा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, किसनराव लोटके, संजय कोळगे, शारदाताई लगड, अरिफ पटेल, संजय सपकाळ, फारूक रंगरेज आदि उपस्थित होते.
Post a Comment