मोदी-शहांचा पक्ष कधीच होणार नाही : गडकरी
नवी दिल्ली- भाजप वाजपेयी किंवा अडवाणींचा पक्ष झाला नाही. आता देखील तीच परिस्थिती आहे. पतप्रंधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा पक्ष होणार नाही. भाजप पक्ष हा कधीच व्यक्तिकेंद्रीत नव्हता आणि तो भाविष्यात देखील होणार आहे. भाजप हा पक्ष े विचारधारेवर आधारलेला आहे. तो तसा होईल, ही चुकीची कल्पना आहे, असे गडकरी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. भाजप आणि मोदी किंवा भाजप आणि पक्षाचे नेते हे परस्परांना पूरक आहेत, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असे अनेकांनी केलेले भाकीत गडकरी यांनी फेटाळले. ते म्हणाले, गेल्या वेळेपेक्षा भाजपला जास्त जागा मिळतील. पक्ष मजबूत असेल, परंतु त्याचे नेते कमकुवत असतील आणि नेते मजबूत असतील परंतु पक्ष कमकुवत असेल तर निवडणुका जिंकता येत नाहीत. पण, लोकप्रिय नेते स्वाभाविकपणे पुढे येतात, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले
Post a Comment