'ती' भेट राजकीय नव्हती - राधाकृष्ण विखे पाटील
माय नगर वेब टीम
मुंबई - काँग्रेसचे नेते आ.राधाकृष्ण विखेंनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली आहे. मात्र ही भेट राजकीय नव्हती, असे विखेंनी स्पष्ट केले आहे.
मराठा समाजाच्या विद्यार्थांना न्याय मिळावा, अशी मागणी गिरीष महाजनांकडे केली असल्याचे विखेंनी सांगितले आहे. गिरीष महाजनांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सध्या राज्यभरात मंत्र्यांचे आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे दुष्काळ दौरे सुरू आहेत. पण दुष्काळावरून कोणी राजकारण करू नये, असे विखे म्हणाले.
Post a Comment