प्रा.राम शिंदेंना विधानसभेला त्यांची जागा दाखवणार - रोहित पवार
माय नगर टीम
अहमदनगर - यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे स्टर प्रचारक व पालकमंत्री राम शिंदेंना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवारांनी दिला आहे. ते जामखेड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संंवाद मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
आगामी काळात स्वत:ची आमदारकी धोक्यात असल्याची चिंता राम शिंदेंना लागली आहे. त्यामुळे शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचा मतदारसंघ सोडला नाही, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
राम शिंदेंनी माझी धास्ती घेतली असल्याने ते लोकसभेचा प्रचार सोडून तालुक्यातच फिरत राहिले, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचे पवारांनी सांगितले.
दरम्यान रोहित पवार यांनी यापूर्वी कर्जत तालुका पिंजून काढला होता. काल त्यांनी जामखेड तालुक्यातील अनेक गावांत भेटी देवून दुष्काळी परिस्थितीतीच पाहणी केली. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. भाजप सरकारवर ताशेरे ओढत शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कामांची आठवण करून दिली. आगामी काळात आपण या तालुक्याकडे विशेष लक्ष देणार असून, येथील प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी बहुतेक गावांत ग्रामस्थांना दिले.
Post a Comment