ऑफिस मध्ये बसून फोनवरून दुष्काळाचा आढावा घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात फिरावे ; पवारचे टीकास्त्र



माय नगर वेब टीम

सातारा - मुंबईच्या ऑफिस मध्ये बसून फोनवरून दुष्काळाचा आढावा घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात जाऊन पाहणी करणे गरजेचे आहे, फोनवरून कोणीही माहिती घेऊ शकतो, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार सातारा येथे दुष्काळ दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यभरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणीही मिळत नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे, असे देखील पवार म्हणाले.

पवारांनी यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली आहे. मी छोट्या लोकांच्या आव्हानाकडे लक्ष देत नाही, मुंबईत बसून व्याख्याने देण्यापेक्षा त्या लोकांनी इथे येऊन पाहणी करावी, असे म्हणत शरद पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post