पिवळ्या साडीतील 'ती' निवडणूक अधिकारी कोण ?
माय नगर टीम
लोकसभेच्या अंतिम टप्यातील मतदान होत आहे. सर्व पक्षातील नेते मंडळी एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग दिसतायेत. त्यांचा हा प्रकार देशातील जनता ऐकतेय आणि पाहतेय. परंतु सोशल मीडियावर निवडणुकीपेक्षा दुसऱ्याचे गोष्टीकडे लागलंय... पिवळ्या साडीमध्ये एक निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे काही फोटो वायरल झाले आहेत. हे फोटो पाहून ती महिला कोण? हे शोधताना दिसत आहेत. तसेच या महिला निवडणूक अधिकारी यांच्या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले असेल असे पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत.
लोकसभेच्या अंतिम टप्यातील मतदान होत आहे. सर्व पक्षातील नेते मंडळी एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग दिसतायेत. त्यांचा हा प्रकार देशातील जनता ऐकतेय आणि पाहतेय. परंतु सोशल मीडियावर निवडणुकीपेक्षा दुसऱ्याचे गोष्टीकडे लागलंय... पिवळ्या साडीमध्ये एक महिला निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे काही फोटो वायरल झाले आहेत. हे फोटो पाहून ती महिला कोण? हे शोधताना दिसत आहेत. तसेच या महिला निवडणूक अधिकारी यांच्या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले असेल असे पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत.
या महिला अधिकारी यांचे फोटो जयपूर येथील आहेत असे सोशल मीडियावर सांगण्यात येते पण हे फोटो उत्तर प्रदेशातील लखनऊ मध्ये काढलेले आहेत. वृत्तपत्र छायाचित्रकार तुषार रॉय यांनी या महिला अधिकारी यांचे फोटो काढले आहेत. ईव्हीएम घेऊन जाणारी महिला अधिकारी ही लखनऊ येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ सह्हायक पदावर कार्यरत असून त्यांचं खरं नाव रीना द्विवेदी आहे.
वायरल झालेली फोटो ५ मे २०१९ ची असून मतदानाच्या एक दिवसापूर्वीची आहे. त्या दिवशी रीना द्विवेदी या लखनऊ च्या नगराम मध्ये बूथ क्रमांक १७३ वर मतदानाची पूर्वतयारी करण्यासाठी गेल्या होत्या. या वायरल झालेल्या फोटो बद्दल रीना द्विवेदी म्हणतात 'आम्ही तर आमची ड्युटी करण्यासाठी गेलो होतो' जेंव्हा मी माझ्या टीम सोबत ईव्हीएम सोबत परत जाताना एका पत्रकाराने फोटो काढले होते. सध्या फोटो खूप वायरल होत आहेत. आता तर घराबाहेर पडले तरी लोकं माझ्यासोबत सेल्फी काढतात.
माझ्या फोटोबद्दल काही चांगल्या तर काही वाईट प्रतिक्रिया येत आहेत. तसेच माझ्या मतदान केंद्रावर ७० टक्के मतदान झाले आहे. पण वायरल झालेल्या फोटो सोबत १०० टक्के मतदान झाल्याचे सांगत आहेत. हे चुकीचे असल्याचे रीना यांचे म्हणणे आहे.
Post a Comment