धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या



माय नगर वेब टीम 
पारनेर -
पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मुले, पत्नीला फाशी देऊन बाबाजी बडे यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बाबाजी विठ्ठल बडे, कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य व धनंजय (सर्व रा. गुणोरे, ता. पारनेर) ही मयतांची नावे आहेत. यातील एक मुलगा दिव्यांग असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. बडे कुटुंबीयांच्या मृत्यू मागे नेमके काय कारण आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post