...अखेर डॉ. अमोल बागुल यांच्या कष्टाचे चिज झाले ; राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहिर



माय नगर वेब टीम

अहमदनगर - शालेय उपक्रम असो की सामाजिक कार्य अथवा नवसंकल्पना. डॉ. अमोल सुभाष बागुल प्रत्येक कामात तन - मन - धनाने हिरीरीने सहभागी व्हायचे. त्यासाठी दिवस - रात्र अपार कष्ट, मेहनत केलेल्या बागुल यांच्या कष्टाचे अखेर चिज झाले. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिक्षकदिनी तो प्रदान केला जाणार आहे. इतक्या कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे बागुल हे राज्यातच नव्हे तर देशात एकमेव असल्याने पुरस्काराची घोषणा होताच नगरात एकच जल्लोष झाला.

विज्ञानभवन, नवी दिल्ली येथे भारताचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या हस्ते शिक्षक डॉ. अमोल बागुल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारत सरकार गृहमंत्रालयाच्या जनगणना २०११ मधील उत्कृष्ट कामाबद्दल जनगणना राष्ट्रपती पदक, धरमपुरी - निंबलक रेल्वे गेटवर प्रसंगावधान राखून रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी मोलाचा सहभाग, महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून मनोधैर्य योजना समिती सदस्य म्हणून अत्याचारित महिलांमुलींसाठी लाखो रुपयांची मदत, मानसिक समुपदेशन व प्रशिक्षण, हरवलेल्या मुलांना शोधून पालकांकडे सुपूर्द केले, विद्यार्थी व कलामार्गदर्शकाला आजीवन सीसीआरटी शिष्यवृत्ती, गणेशोत्सव - नवरात्रीत अनाथ मुले घरात सांभाळली, चाळीस मुले दत्तक घेतली, वाढदिवसानिमित्त २२ दुष्काळग्रस्त गावांना पाणी वाटप, एकाच शैक्षणिक वर्षात सुमारे २७६ विविध उपक्रम बागुल यांनी राबवले. झिरो स्कूल बॅग पॅटर्न, स्टुडन्ट आयडी कार्ड फोन , कोड आयडी कार्ड, समर्थ ई क्लासचे ११४ आयसीटी गॅजेट्स, २२ शैक्षणिक अँपची निर्मिती, आरसा वही, नासा किड्स क्लब, सायन्स टॉईज बँक , रंग मूल्यांकन पद्धती, ओपन पेपर डे, अभ्यासक्रमातील कवितांचे जागतिक मराठी भाषादिनी ७७ सार्वजनिक ठिकाणी गायन, रंगसमर्थ जागतिक उपक्रम, १७७ जागतिक विश्वविक्रमात सहभाग , समर्थकन्यांचे बक्षीस घर, महाराष्ट्र देशा - दगडांच्या देशा - गारगोटी प्रदर्शन , सिनेमा - लघुपट मालिकांतील विद्यार्थ्यांच्या भूमिका, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, पाच बोटांपासून सप्तसूरांपर्यंत संस्कार उपक्रम, संडे आर्ट स्कूल,

घरीच शैक्षणिक साहित्याची खोली, ५७ ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता, स्वच्छतादूत, मतदारदत, एड्स व्हाट्सअपदत म्हणून कार्य, हनिबेल स्पेस अकॅडमी, अमेरिका कॅम्पसाठी व नासा स्पेस कॅम्पसाठी बागुल यांची निवड झाली होती.


२०० प्रशिक्षण अन् इंटरनॅशनल कॉन्फरन्स वर्ल्ड टीचर फोरमच्या स्थापनेच्या माध्यमातून १२१ देशातील सुमारे ५ हजार शिक्षकांच्या शैक्षणिक नवसंकल्पना आदानप्रदानासाठी प्रयत्न, ९ पुस्तकांचे लेखन, २ देशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, २०० पेक्षाजास्त प्रशिक्षणे, ५० पेक्षाजास्त कोर्सेस आदी घटकांचा गौरव जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांनी पुरस्कार देताना केला.    




0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post