भाजपात मेगा भरतीचा धडाका ; आता 'हे' नेते करणार प्रवेश



माय नगर वेब टीम
मुंबई : भाजपमध्ये पुढच्या मेगाभरतीचा मुहूर्त ठरला आहे. एक आणि पाच सप्टेंबरला होणार पुढची मेगाभरती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असून आघाडीला चांगलेच भगदाड पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

एक सप्टेंबरला सोलापुरात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत तर पाच सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत हे प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, सिद्धराम म्हेत्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवारांचे निकटवर्तीय उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह यांचा देखील भाजप प्रवेश होईल, अशा चर्चा आहेत. दोघेही जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर होते.


एकीकडे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगता आहेत, मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं समजतं. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व जागांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post