जुन्या वादातून चाकूने सपासप वार ; गुन्हा दाखल



माय नगर वेब टीम

अहमदनगर – जिल्हाधिकारी कार्यालय परिसारातील पराग बिल्डिंगजवळ जुन्या वादातून एकावर चाकूने हल्ला झाल्याची घटना 16 ऑगस्टला झाली होती. या प्रकरणी शनिवारी (दि.24) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजूम नजीर तांबटकर, अन्वर नजीर तांबटकर, आरशान अजूम तांबटकर, जिशान तांबटकर अशी आरोपीची नावे आहे.

सनी ज्ञानेश्वर जगधने यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पराग बिल्डिंगजवळ ही घटना घडली आहे. यातील फिर्यादी व साक्षीदार पायी जात असताना काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून तांबटकर याने फिर्यादी जगधने आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणयात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post