दहीहंडीचा उत्सव ; गोविंदांचे थरावर थर - ५१ गोविंदा जखमी


माय नगर वेब टीम



मुंबई: आज दिवसभर मुंबई सह सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात असून त्यामध्ये एकट्या मुंबई शहरात ५१ गोविंदा दहीहंडी फोडताना जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या जखमी गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही गोविंदांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान मुंबई मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदाना पालिका तसेच इतर सार्वजनिक रुग्णालयाद दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी [पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारी नुसार ५१ गोविंदा जखमी झाले असून त्यातील २७ गोविंदांना घरी सोडले आहे. तर उर्वरित २४ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. ठाण्यात मनसेच्या दहीहंडीत थरांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केला. जय जवानकडून 10 थरांच्या प्रयत्नात 9 थर लावले गेले. तर मुंबईतल्या दादरच्या आयडियल गल्लीतील दहीहंडीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साकारण्यात आला. घाटकोपरमध्ये क्रांती क्रीडा गोविंदा पथकाच्या वरच्या थरावर गणपती बाप्पा विराजमान झाल्याचे दाखवण्यात आले.

ठाण्यातील नौपाडामध्ये मनसेची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. जय जवाननं तिथे 10 थर लावण्याचा प्रयत्न केला, मात्र नऊ थर लावल्यावर ते कोसळले. मात्र असं असलं तरी त्यांनी नऊ थरांच्या विश्वविक्रमाशी त्यांनी बरोबरी केली आहे. ठाण्यातीलच संस्कृती प्रतिष्ठान या शिवसेनेच्या दहीहंडीत जय जवाननं नऊ थर लावले.

मुंबई उपनगरात घाटकोपरच्या भटवाडी विभागात लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सालाबादप्रमाणे दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक पथकांनी सलामी देण्यासाठी हजेरी लावली आहे.
वरळीच्या बावन चाळ येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रगती क्रीडा मंडळाचा उत्साह पाहायला मिळाला. या ठिकाणी मानव साखळी करून ढोल ताशात हे गोविंदा पथक बजरंगबलीची गदा घेऊन दहीहंडी फोडयाला नाचत निघाले. 47 वर्ष जुन्या या गोविंद पथकाचा पारंपरिक उत्साह पाहण्याजोगा होता.

दादर प्लाजा कॉर्नर जवळ सुद्धा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. या ठिकानी महाराष्ट्रातलं पाहिलं गोविंद पथक यामध्ये अंध- दिव्यांग गोविंदा हंडी फोडायला सज्ज झाले होते. 2 ते 3 महिने मेहनत करून हे अंध गोविंदा आता आजच्या दिवसासाठी सज्ज झाले

भांडुपमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईव्हीएम विरोधात पुकारलेल्या आंदोलनला दहीहंडी उत्सवात सुद्धा प्रचार केला गेला. भांडुपमध्ये 'मतदानात ईव्हीएम नको, बॅलेट पेपरचा हवा' अशा प्रकारचा संदेश असणारे 5 हजार टी शर्ट विविध गोविंदा पथकांना वाटप केले.

मुंबईचा सर्वात जुनं गोविंदा माझगाव ताडवाडी गोविंदा पथक याला यावर्षी 74 वर्ष पूर्ण झाले. दादर, शिवडी, लालबाग करत आता हे गोविंद पथक ठाण्याच्या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले. जवळपास 800 ते 1000 गोविंदा एकत्र येऊन दोन महिन्याच्या तयारी नंतर आठ थरांची सलामी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post