डॉ. डौलेज डेंटल पॉलिक्लिनिकच्या नगर शाखेचे मंगळवारी उदघाटन



माय नगर वेब टीम

अहमदनगर - गेल्या पंधरा वर्षापासून पुण्यात कार्यरत असलेले डॉ. डौलेज डेटल पॉलिक्लिनिकची नगरमधील पहिली व राज्यातील तिसरी शाखा नगर मध्ये सुरू होत आहे. येत्या मंगळवारी (दि.3) सायंकाळी 6 वाजता सावेडी रोड परिसरातील सन्मित्र कॉलनीत या शाखेची सुरूवात होणार असल्याची माहिती संचालक दंतरोगतज्ज्ञ डॉ.राजेंद्र डौले व डॉ.नीलिमा डौले यांनी सांगितले.

डॉ.डौले दाम्पत्याच्या अधिपत्याखाली डौलेज डेंटल पॉलिक्लिनिकच्या पुण्यात दोन शाखा सध्या कार्यरत आहेत. डॉ.डौले दाम्पत्य गहरी तालक्यातील जोगेश्वरी आखाडा येथी रहिवासी आहेत. दोघेही एम.डी.एस आहेत. डॉ. राजेंद्र डोले यांनी रूट कॅनालमध्ये. तर डॉ. नीलिमा डौले यांनी हिरड्यांच्या आजारामध्ये स्पेशलायझेशन केले आहे. नगरच्या शाखेत पुण्याप्रमाणेच सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री व सुविधा मिळणार असून, उपचारांच्या फी मध्ये रुग्णांना मोठी सवलत मिळणार असल्याचे डॉ.डौले यांनी सांगितले.

आम्ही नगरचे काही देणे लागतो, या भावनेतून वैद्यकीय सेवा सामान्यांच्या दारात नेली. त्यांच्या नीतिमत्ता व तत्वांचा कित्ता आम्ही नगरमध्ये गिरवणार असून, सामान्य रुग्ण व त्याचे हीत या बाबींनाच आमचे प्राधान्य राहणार असल्याचे डॉ. राजेंद्र डौले व डॉ.नीलिमा डौले यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post