घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना ७ तर देवकर यांना 5 वर्षाची शिक्षा ; १०० कोटींचा दंड




माय नगर वेब टीम
जळगाव -

घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर गुलाबराव देवकर यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरेश जैन यांना १०० कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर गुलाबराव देवकर यांनाही मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आला आहे. सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण ४८ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. प्रत्येकाचा घोटाळ्यात जो काही सहभाग होता त्यानुसार कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. धुळे न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या घोटाळा प्रकरणी तारीख पे तारीख पडत होती. मात्र आज अखेर या प्रकरणी ४८ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच सुरेशदादा जैन यांना सात वर्षांची शिक्षा आणि १०० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.


काय आहे हा घोटाळा

>> 'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती.
>> झोपडपट्टीत राहणाऱ्यांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी आणि झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
>> १९९९मध्ये हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास सुरुवात झाली होती.
>> मात्र २००१मध्ये या योजनेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं होतं
>> ज्या जागेवर घरकुल बांधण्यात आले होते, ती जागाही पालिकेच्या मालकीची नसल्याचं उघड झालं होतं
>> अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहारही उघडकीस आले होते
>> सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. त्याला नियमबाह्य पद्धतीने सुमारे २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ दिले होते
>> ठेकेदाराने वेळेत ही घरे बांधून दिली नाही, तरीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती
>> महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर ३ फेब्रुवारी २००६ रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत २९ कोटी ५९ लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार नोंदवली होती

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post