कांदा विक्रेत्यांना दिलासा : कांदा अनुदानासाठी 73.21 कोटी मंजूर



माय नगर वेब टीम

मुंबई : राज्यात हंगाम 2018-19 मध्ये कांद्याच्या दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल रूपये 200 आणि जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत प्रती शेतकरी दुसरा टप्पा अनुदान जाहीर केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तसेच प्रसन्ना कृषी मार्केट पाडळीआळे या खासगी बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी 73 कोटी 21 लाख 89 हजार 677 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती पणनमंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे.

कांदा अनुदान वितरण प्रक्रिया सुरू झाली असून अहमदनगर जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमधील 92 हजार 587 लाभार्थी पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधून आपले बॅंक खाते क्रमांक आणि आवश्यक ती माहिती तत्काळ द्यावी. अनुदानाची रक्कम ही आयसीआयसीआय बॅंकेच्या माध्यमातून दिली जात असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्घ आयसीआयसीआय बॅंकेचे प्रतिनिधींची टीम उपलब्ध असणार आहे. अनुदानासाठी काही अडचणी असतील तर शेतकऱ्यांनी थेट या टीमशी संवाद साधवा, असे, आवाहन पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.




राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दि. 16 डिसेंबर 2018 ते 28 फेंब्रुवारी 2019 या कालावधीतील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post