केडगावच्या विकासासाठी मी खंबीर ; आमदारकीच्या माध्यमातून 10 कोटींचा विकास



आ.संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; केडगाव गावठाणात रस्ते काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

माय नगर वेब टीम

अहमदनगर - महापालिकेत महापौर असताना आणि त्यानंतर आमदारकीच्या माध्यमातून केडगाव उपनगरासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर करुन त्यातून विविध प्रकारची कामे केली आहेत. या उपनगरातील नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी यापुढील काळातही आपण कटीबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून केडगाव मधील जुन्या गावठाणातील विविध कॉलन्यांमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ हभप रामदास क्षिरसागर महाराज यांच्या हस्ते व प्रभाकरराव गुंड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळी आ.जगताप बोलत होते. कार्यक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, नगरसेवक मनोज कोतकर, माजी नगरसेवक सुनील कोतकर, सुनील रामदास कोतकर, जालिंदर कोतकर, रामदास कोतकर, संभाजी सातपुते, बहिरु कोतकर, युवराज कोतकर, अनिल तुबे, गणेश सातपुते, सुजित काकडे, शिवाजी पठारे, अभिजित खोसे, बाबासाहेब गाडळकर, निलेश सुंबे, भुषण गुंड आदी उपस्थित होते.

यावेळी आ.जगताप म्हणाले की, शहरात आता जातीधर्माच्या नावावर राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. आपण शहरात खऱ्या अर्थाने विकासावर चर्चा सुरु केली त्यामुळे केवळ भावनिक कॅसेट वाजविणाऱ्यांचे तोंड बंद झाले आहे. केडगाव परिसरात गेल्या सात-आठ वर्षात विविध विकासकामे झाली आहेत. केडगाव देवी रस्त्याचे कामही आपण मार्गी लावले त्यामुळे यापुर्वी केवळ नवरात्रोत्सव आला की रस्त्याची पाहणी करत फोटोसेशन करायचे असा उद्योग करणाऱ्या पुढाऱ्यांचे फोटोसेशन आपण बंद केले आहे. आपण कधीही चकीचे काम केले नाही आणि यापढेही करणार नाही. केडगाव उपनगरासह नगरच्या एमआयडीसीच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. आयटी पार्क सुरु झाल्यावर अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारची विधायक कामे यापुढेही सातत्याने करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, आ.जगताप यांच्या माध्यमातून केडगाव उपनगरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. त्यांच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. मात्र नागरिक अशा बालिश राजकारण्यांना चांगले ओळखून आहेत. सर्व केडगावकर आ.संग्राम जगताप यांच्या पाठिशी नेहेमीच उभे राहतील असेही ते म्हणाले. प्रभाकर गुंड म्हणाले की, आ.जगताप यांनी केडगावला सक्षम नेतृत्व दिले आहे. अडचणीच्या काळात त्यांनी विकासकामांची धुरा सांभाळत नागरिकांच्या अडचणी सोडविल्या आहेत असेही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post