जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेचा आमदार चषक त्रिमूर्ती पब्लिक स्कूलने पटकावला



एमआयटी स्कूल सुपा, द्वितीय तर पोद्दार स्कूल जामखेड तृतीय पुरस्काराचे मानकरी

माय नगर वेब टीम

अहमदनगर - जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आयोजित 33 व्या जिल्हास्तरीय आणि दुसऱ्या आमदार संग्राम जगताप चषक किकबॉक्सिंग स्पर्धेच्या विजेते पदाचा चषक नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलने पटकावला आहे. या स्पर्धेत एमआयटी स्कूल सुपा, द्वितीय तर पोद्दार स्कूल जामखेड तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.

33 व्या जिल्हास्तरीय आणि दुसऱ्या आमदार संग्राम जगताप चषक किकबॉक्सिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, नगरसेवक अविनाश घुले, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, संभाजी पवार, संतोष लांडे, विशाल पवार, ओंकार घोलप, संतोष ढाकणे, लंकेश चितळकर, स्वप्नील भोरे, किक बॉक्सिंग असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष खैरनार, सचिव स्वप्निल वारुळे, संकेत चव्हाण, रवींद्र कदम, रोहित वाघ, श्रवण जंजाळे, युवराज डोळे, नेहा बनकर, चेतन चव्हाण, रोहित कजबे, वसीम शेख, अमोल गुंजकर, अनिल पिंपळे, जयश्री डोळे, विषाल जेढे, वरूण शेटे, मंदार मस्के, सौरभ हारदे, अश्विनी शिंदे, किरण डवले, सोमनाथ मेहेत्रे, अनिकेत सुतार आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत नगर शहरासह १२ तालुक्यातून ५६८ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये २१० खेळाडूंनी गोल्ड मेडल तर ९० खेळाडूंनी सिल्वर, ३८ खेळाडूंनी ब्रॉंज मेडल जिंकले. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची शिर्डी येथे दि.१४ ते १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ३०व्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांच्यासह जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन, युवा फिटनेस प्लॅनेट अहमदनगर यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते.

यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच खेळालाही तेवढेच महत्व दिले पाहिजे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते व त्यामुळे कष्ट करण्यास उर्जा मिळते, म्हणून शिक्षण आणि खेळाची सांगड घातल्यास सुदृढ आणि ज्ञानी पिढी घडण्यास मदत होत असते. खेळामुळे जीवन समृद्ध होते. खेळाडूला समाजात मान, प्रतिष्ठा मिळत असते. जे खेळाडू असतात ते व्यसनापासून दूर राहतात, आज समाजात तरुणांची वाढती व्यसनाधीनता ही मोठी समस्या आहे. खेळाची आवड हा यावर नामी उपाय असल्याचे ते म्हणाले. खेळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिले नसून, अनेक विद्यार्थ्यांना खेळात करिअर घडविण्याची संधी निर्माण झाली आहे. काही विद्यार्थ्यांना खेळाची आवड असते. पालकांनी देखील त्यांची आवड लक्षात घेऊन त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन दिल्यास उत्तम खेळाडू घडणार आहे. तर युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात स्पर्धेचे आयोजक वैभव ढाकणे म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, हे स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन नवोदित खेळाडूंना एक व्यासपिठ निर्माण करुन देणे या स्पर्धेमागील हेतू

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post