लोकन्यायालयामुळे पक्षकारांतील मतभेद कायमचे दूर होतात ; १४ सप्टेंबरला लोक अदालत



माय नगर वेब टीम

अहमदनगर - पक्षकारांनी आपआपसातील वाद न्यायालयाच्या मदतीने लोक न्यायालयात मिटविले जातात. त्याला लोकन्यायालय म्हणतात. लोकन्यायाल ही कल्याणकारी योजनाही आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.१४ सप्टेबर) रोजी सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुनीलजीत पाटील यांनी दिली.




वर्षभरामध्ये चार लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येत आहे. नेहमीच कोर्टाच्या निकालाला वेळ लागतो त्यामुळे पक्षकाराचा वेळ व पैसा वाया जातो. तसेच आपआपसातील मतभेद टोकाला जातात. याचा परिणाम आपल्या कुटुंबावर होतो. दोन्ही पक्षकारांनी लोकअदालतच्या माध्यमातून आपआपसातील वाद मिटविल्यास, समझोता केल्यास खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाची सुरुवात होते. दोन्ही कुटुंबामध्ये नाते निर्माण होते व आपले कुटुंब गुण्यागोविंदाने संसार करतात. छोट्या वादाचे रुपांतर मोठ्या वादामध्ये होण्याची शक्यता असते यासाठी पक्षकाराने आपले प्रकरणे लोक न्यायालयात मिटवावेत, असे आवाहन न्या. पाटील यांनी केले.

आम्ही जास्तीत-जास्त प्रकरणे लोकन्यायालयात ठेवली आहे. पक्षकारांना जरी नोटीस मिळाली नसेल तरी तडजोडीसाठी लोकअदालतमध्ये यावे. लोकअदालतमध्ये मिटलेल्या प्रकरणांना पुन्हा न्यायालयात अपील करता येत नाही. लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे मिटल्यास बाकीच्या प्रकरणाचा निकाल लवकरच लागेल व न्यायालयावरील कामाचा ताण कमी होईल.

लोकअदालतमध्ये ठेवण्यात येत असलेले प्रकरणे ही १३८ चे प्रकरण, बँक प्रकरणे, महसलची प्रकरणे, कौटुंबिक वाद, वैवाहिक वाद, कामगार वाद, एम.ई.सी.बी.ची प्रकरणे आदींसह विविध प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत, असे ही न्या. पाटील म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post