धक्कादायक ! हॉस्पिटल चालकांस वेठीस धरून 'ते' अधिकारी उकळतात पैसे ; कर्मचाऱ्याच्या मृत्यूस अधिकारीच जबाबदार




आरोग्य विभागातील अधिकार्‍याच्या निलंबणाची राष्ट्रवादीची मागणी

माय नगर वेब टीम

अहमदनगर - महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे महापालिका आरोग्य विभागातील कंत्राटी कामगाराचा बळी गेला असून, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी तसेच मनपा आरोग्य विभागातील अधिकारी हॉस्पिटल चालकांना वेठीस धरुन पैसे उकळत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करुन सदर अधिकार्‍यांचे निलंबन करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आ.संग्राम जगताप यांच्या वतीने केली आहे. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना देण्यात आले. 


यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, बाबासाहेब गाडळकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी माथाडी कामगार विभागाचे ऋषीकेश ताठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव ढाकणे, राष्ट्रवादी आयटी विभागाचे शहराध्यक्ष महेश बुचडे, विनीत म्हस्के, , रोहन शिरसाठ, भारत गरूडकर,अक्षय गाडळकर, विपुल वाखरे, ओंकार गादिया, आदित्य करमाळकर आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.




अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कोंडवाडा विभागामध्ये स्व.बाबाजी शिंदे हंगामी कर्मचारी म्हणून श्‍वान पकडण्याचे काम करत होते. गेल्या अनेक वर्षापासून ते या विभागात कार्यरत होते. गेल्या काही वर्षापासून महापालिकेच्या माध्यमातून निर्बीजीकरण व लसीकरणाचे काम एका खाजगी संस्थेमार्फत चालू होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ते काम बंद असून त्यांच्या जागेवर आरोग्य विभागाकडून हंगामी कर्मचारी ठेवून श्‍वान पकडण्याचे काम चालू आहे. परंतु श्‍वान पकडताना हंगामी कर्मचार्‍यांना कोणत्याही स्वरूपाचे संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यांची नसबंदी व लसीकरण याची कोणतीही सुविधा हंगामी कर्मचार्‍यांची नेमणूक केल्यापासून नव्हती. यामुळे मोकाट कुत्र्यांना लसीकरण किंवा मोकाट कुत्र्यांपासून हंगामी कर्मचार्‍यांना किंवा नागरिकांना कोणता आजार होऊ नये याचे प्रतिबंधात्मक सुविधा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पुरविण्यात आलेल्या नाहीत. तसेच हंगामी कर्मचार्‍यांचे हेल्थ इन्शुरन्स देखील करण्यात आलेले नाही. दि.25 ऑगस्ट रोजी बाबाजी शिंदे यांचा डेंग्यूमुळे दुर्देवी मृत्यू महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या हलगर्जी व बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे झालेला आहे. यामुळे स्व. शिंदे यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे स्व. शिंदे यांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी.




तसेच मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी शहरातील बर्‍याच हॉस्पिटल चालकांना वेठीस धरून जादा बेड लावण्यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये प्रति बेडप्रमाणे पैसे उकळण्याचा धंदा करीत असल्याचा आरोप आ.संग्राम जगताप यांच्या वतीने शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील महिला व परिचारिका यांच्याशी सुद्धा या विभागातील अधिकार्‍यांची वर्तणूक चांगली नसल्याचे अनेक तक्रारी आहेत. या संपूर्ण बाबीचा विचार करत आरोग्य विभागाशी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहन

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post