पाण्याचा ताळेबंद आणि पिक नियोजन केले तरच पाणी समस्या सुटू शकते



माय नगर वेब टीम

नवी दिल्ली –

पाण्याचा ताळेबंद आणि पिक नियोजन केले तरच पाणी समस्या सुटू शकते, असे प्रतिपादन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.

२३ ऑगस्ट २०१९ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय भूमिजल बोर्ड व जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या वाटर टोक या कार्यक्रमात पवार बोलत होते. पवार पुढे बोलताना म्हणाले पाणी समस्या हि निव्वळ आता भारताची समस्या राहिली नसून संपूर्ण जगाची समस्या झाली आहे. विकासाच्या नावाखाली गेल्या १०० वर्षात नैसर्गिक साधनसंपत्ती चे मोठ्या प्रमाणावार शोषणामुळे आज संपूर्ण जगामध्ये पाणी समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. म्हणून आता ताळेबंदाचे आणि पिकाचे नियोजन करून आपल्याला पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

या कार्यक्रमास श्री.यु.पी.सिंग सचिव जलशक्ती व गंगा शुद्धीकरण मंत्रालय भारत सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.श्री.पवार बोलताना पुढे म्हणाले हिवरे बाजार येथे फक्त पाणी अडवून जिरवणे एवढेच काम केलेले नसून उपलब्ध पाण्याचा ताळेबंद व पिक नियोजन केले असून बोअरवेल बंदी, कमी पाण्यावर येणारी पिके ,ऊस केळी यासारखी जास्त पाण्याची पिके घेण्यावर बंदी ,ठिबक व तुषार सिंचन जास्तीत जास्त वापर केलेला आहे.भविष्यात कारखान्याचे सांडपाणी व गटाराचे सांडपाणी याचा पुनरवापर करणे गरजेचे आहे तरच शेतीला पाणी मिळू शकते.भूगर्भातील पाणी उपसा करून जमिनीवर पाणी साठविल्यामुळे बश्पिभावन होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते.

अंगणवाडी ते पदवी पर्यंत अभ्यासक्रमात पाण्याचा ताळेबंद विषय सक्तीचा करणे गरजेचे आहे. याप्रसंगी यु.पी.सिंग सचिव जलशक्ती व गंगा शुद्धीकरण मंत्रालय भारत सरकार यांनी बोलताना सांगितले कि हिवरे बाजार हे देशातील काम करणार्यासाठी मक्का मदिना व गंगोत्री आहे. तसेच अखिलकुमार सिंह सहसचिव जलशक्ती व गंगा शुद्धीकरण मंत्रालय भारत सरकार यांनी सांगितले कि देशातील टंचाईग्रस्त गावातील सरपंचाना आता हिवरे बाजारला पाठवून जलसाक्षर करणार आहे. सदर कार्यक्रमास जलशक्ती मंत्रालय अधिकारी, भूमिजल बोर्ड अधिकारी, विविध स्वयंसेवी संस्था ,प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post