धार्मिक सण - उत्सवांची समाजाला गरज



आ.संग्राम जगताप; पावन चालिहो उत्सावाची सांगता

माय नगर वेब टीम

अहमदनगरर- धार्मिक सण-उत्सव साजरे केल्याने समाज एकत्र येतो व त्यातून समाजाचे विविध प्रश्न सुटत असतात त्यामुळे अशा सण-उत्सवांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

गुलमोहोर रोडवरील पुज्य माता लालवारी मंदिरात सिंधी समाजाच्या दिनांक १६ जुलै ते २४ ऑगस्ट पर्यंत चाललेल्या आयोलाल झुलेलाल चालिहो उत्सवाची सांगता आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती करुन करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रमेश नवलाणी, भगवान मोतियानी, मनोहर टेकवानी, विनोद कुकरेजा, ज्ञान नवलाणी, नरेश दादवाणी, श्याम टेकवाणी, हरेष रंगलाणी, धरम माधवाणी, मुरलीधर नवलाणी, ठाकुर नवलाणी, विकी तोलाणी, मनोज मोतियानी यांच्यासह आहूजा परिवार व समाजबांधव उपस्थित होते. आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की, अशा सण-उत्सवांमुळे युवकांना धार्मिकतेची गोडी लागते, आजच्यायुवा पिढीला शिक्षणाबरोबरच धार्मिकता आणि संस्कृतीची शिकवण मिळणे आवश्यक आहे. यासाठीच सिंधी समाजाच्या पावण चालिहो उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते असे त्यांनी सांगितले. या चालिहो उत्सवामध्ये दररोज सकाळी आरती, देवाची प्रार्थना करण्यात आली. समाजबांधवांमध्ये भाईचारा व सामाजिक आपुलकी वाढावी, नगर शहर व जिल्हाभरात चांगला पाऊस पडावा यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. या उत्सवामध्ये सुमारे ४० दिवस समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post