राज्य सहकार बँक घोटाळा; अजित पवारांसह बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल


माय नगर वेब टीम
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, शिवाजीराव नलावडे, आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.


दरम्यान या प्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या 42 जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या 34 माजी संचालकांविरोधात पाच दिवसांत गुन्हा दाखल करून कायद्यानुसार चौकशी करा, आसे आदेश उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. यामध्ये तत्कालीन संचालक असलेले अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण, माणिकराव पाटील, दिलीप देशमुख, गुलाबराव शिर्के, प्रसाद तानपूरे, खासदार आनंदराव अडसूळ, सुरेश देशमुख, जयंत पाटील, दिलीप सोपल, राजन तेली, शिवाजीराव नलावडे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान राजकीय नेत्यांनी आपल्या संबंधातील व्यक्ती आणि संस्थांना नियम डावलून कर्ज दिल्याने रिजर्व बँकेला यावर प्रशासक नेमावा लागला आहे. तसेच या संदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग आदींनी अहवाल देऊनही गुन्हा नोंदवण्यात आला नाही, असा आरोप करत एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post