'त्या' प्रश्नावर शरद पवार भडकले ; म्हणाले तुम्ही चुकीचं बोलताय असं नाही वाटत का?




माय नगर वेब टीम

अहमदनगर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज श्रीरामपूर येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांचे रौद्र रूप पाहायला मिळाले आहे. एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार संतापले “नातेवाईकाचा आणि राजकारणाचा काय संबंध, तुम्ही नातेवाईकांचा का विषय काढता ? तुम्ही चुकीचं बोलताय असं नाही वाटत का” असा प्रति प्रश्न करत ते उठले.


दरम्यान राष्ट्रवादीच्या नेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप सेनेत प्रवेश केले आहे. तसेच त्यांचे नातेवाईक माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यावर एका पत्रकाराने प्रश विचारला असता “नातेवाईकाचा आणि राजकारणाचा काय संबंध” असे बोलत त्यांचा रुद्र अवतार सर्वाना पाहायला मिळाला. त्या नंतर पवार म्हणाले तुम्ही चुकीचं बोलताय असं नाही वाटत का. तुम्हाला जर असेच बोलायचे असेल तर मला काहीच नाही बोलायचं आणि ते उठले. परंतु इतर पत्रकारांच्या सांगण्यावरून ते पुन्हा बसले. तसेच प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला तुम्ही निघून गेलात तर बरे होईल असे पवारांनी सांगितले. पवारांचा हा रौद्र अवतार पाहून सर्वच उपस्थित भावुक झाले.

मागील काही काळात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला असून खासदार उदयनराजे, जेष्ठ नेते छगन भुजबळ, पद्मअसिंह पाटील इत्यादी नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post