शिवसेनेत गृहकलह ; राठोड यांच्यासह शिंदे व कदम यांचा उमेदवारीवर दावा



माय नगर वेब टीम

अहमदनगर – उपनेते अनिल राठोड हे शिवसेनेकडून आमदारकिच्या उमेदवारीचे मजबूत दावेदार असतानाच आता शिवसेनेच्या माजी महापौर शीलाताई शिंदे यांनी विधानसभेचे रणशिंग फुकले आहे. त्यातच माजी महापौर सुरेखा कदम याचे मिस्टर माजी शहरप्रमुख संभाजीराजे कदम हे देखील विधानसभेची तयारी करत आहेत. उपनेते राठोड यांच्या बरोबरीने शिंदे व कदम यांनी वरिष्ठांकडे शहर विधानसभेवर शिवसेनेच्या उमेदवारीचा हक्क सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता नगर शिवसेनेवर एकहाती वर्चस्व असलेल्या राठोड याना स्वपक्षातूनच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.


अनिल राठोड यांनी गेली पाच वर्षे नगर विधानसभेवर शिवसेनेचे वर्चस्व होते. २०१४ साली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती शेवटच्या क्षणी युती तुटली त्यातच कॉगेस व राष्ट्रवादीत बिघाडी झाल्याने राठोड यांचा अल्प मताने मताने पराभव झाला. मात्र गेल्या काही वर्षांत शहराच्या राजकारनात अनेक घडामोडी घडल्या. मात्र पराभव नंतर राठोड हे पुन्हा ताकदीने विधानसभेसाठी सज्ज झाले. त्यातच भाजपचे खासदार सुजय विखे याना लोकसभेच्या निवडणूकित नगर शहरातून 50 हजाराची आघाडी प्राप्त करून देण्यात राठोड व शिवसेनेचा खारीचा वाटा होता. प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला अनिल राठोड हे एकमेव नाव उमेदवारीसाठी पुढे होते. यंदा त्यांच्या बरोबरीने माजी महापौर शीला शिंदे व संभाजीराजे कदम ही दोन मोठी नावे उमेदवारीच्या यादीत आली आहे. विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी त्यांनी मुंबईत जोरादार फिल्डिंग लावली आहे. शहराच्या राजकारणात माहिर असलेले शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे हे माजी महापौर शीला शिंदे यांचे पती आहेत. त्यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात फेज १ व फेज २ पाणी योजना, बालिकाश्रम रोड, कोठी रोड, दर्गादायरा रोड , केडगाव देवी रोडची कामसह अनेक मोठी कामे केली आहे. त्यासोबत ३१ कोटी रुपयांचा १ हजार घरकुलांचा प्रोजेक्टही राबविण्यात त्याचा मोठा वाटा आहे. सावेडीतील स्पर्धा परीक्षा केंद्र, नाट्यसंकुल, रेल्वेस्टेशनचा लोखंडी पूल ही कामेही शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झाली. त्या विकासकामाच्या जोरावरच शिंदे यांनी तिकिटासाठी मजबूत फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान संभाजी कदम हे गेली १२ वर्षे शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून काम करत होते. पत्नी सुरेखाताई या महापौर झाल्यानंतर त्यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पत्नी महापौर असताना त्यांच्या कार्यकाळातील कामे व शहरप्रमुख असतांना झालेले संघटनात्मक कामावर त्यांनी शिवसेनेकडे आमदारकीचे तिकिट मागितले असल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.

शिवसेनेत गट-तट
युतीच्या जागा वाटपात नगर शहराची जागा शिवसेनेकडे आहे. ही जागा भाजपकडे घेण्याची मागणी यापूर्वीच भाजप नगरसेवकांकडून करण्यात आली होती. युती की स्वबळ याबाबत भाजप शिवसेनेत अजून निश्चित दिशा मिळालेली नाही. मात्र, दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्याने शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्चित असल्याचे शिवसेनेतूनच सांगितले जात आहे. राठोड यांच्या व्यतिरिक्त सेनेतील अन्य काहीजण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षनिरीक्षक विलास घुगरे यांनी ३ ऑगस्ट रोजी नगरमध्ये येऊन शिवसेना नगरसेवकांची मते जाणून घेतली होती. या मुलाखतीबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. फक्त नगरसेवकांनाच निरोप धाडण्यात आले होते. यामुळे शिवसेनेत उघड - उघड दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post