विधानसभा : वंचित बहुजन आघाडीच्या इच्छूक उमेदवारांच्या 25 ऑगस्ट रोजी मुलाखती



विधानसभेसाठी इच्छूक असणार्‍या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

माय नगर वेब टीम
अहमदनगर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. वंचितकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी सकाळी 10ः30 वाजता दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजी विधानसभेसाठी इच्छूक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, यांनी दिली आहे. 

या मुलाखती पार्लमेंटरी कमिटी घेणार आहेत. या पार्लमेंटरी कमिटीमध्ये अण्णाराव पाटील, अशोक सोनुने, रेखाताई ठाकूर, किसन चव्हान आदी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक सोनवणे यांच्याशी संपर्क करावा.
राज्यात वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद बघुन अनेक प्रस्थापित नेते, वंचितच्या वाटेवर आहेत. वंचितला मिळणांरा प्रतिसाद बघून प्रस्थापित नेत्यांना धडकी भरली आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यात वंचितच्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. त्यामुळे या मुलाखतींसाठी इच्छूक उमेदवारांनी आपला बायोडाटा व कार्य अहवाल घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सचिव दिलीप साळवे यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post