ये रे ये रे पावसा - बळीराजाचे साकडे ; चारा छावण्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


माय नगर वेब टीम
मुंबई – राज्याच्या अनेक भागात पूरामुळे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असले तरी अनेक भागात अजूनही पावसाने ओढ दिली आहे. राज्याच्या काही भागात अजूनही दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने चारा छावण्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास आज राज्य सरकारने मान्यता दिली. या चारा छावण्यांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दररोज किमान दहा कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरु असून सुमारे ६० हजार जनावरे छावनीत आहेत.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्यात आल्या. सुरवातीला या चारा छावण्या जून महिन्यापर्यंत सुरु करण्याचा निर्णय झाला होता. पण पावसाला झालेला विलंब परिणामी जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन 31 ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरु ठेवण्याचा निर्णय मंत्रीमंडळ उपसमितीने घेतला होता. पण राज्यातल्या काही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता 30 सप्टेंबरपर्यंत चारा छावण्यास सुरु करण्यास राज्याच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post