विधानसभा निवडणूक : प्रशासनाची तयारी जोरात


माय नगर वेब टीम

अहमदनगर - आगामी विधानसभा निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरसाठी आवश्यक असणारी 17 हजार 680 मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. त्याची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) सध्या करण्यात येत असून आतापर्यंत 86 टक्के बॅलेट युनिट व 74 टक्के कंट्रोल युनिटची तपासणी पूर्ण झाली आहे. यात 199 यंत्रांत तांत्रिक बिघाड आढळल्याने ती तपासणीत बाहेर काढली गेली. ही तपासणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटची तपासणी होणार आहे.

ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याची आचारसंहिता अद्याप जाहीर झालेली नाही. जिल्हा प्रशासन पातळीवर त्याची जोरदार तयारी सुरू आहे. मतदान यंत्रांची तपासणी, मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान कर्मचार्‍यांच्या नेमणुका अशी कामे निवडणूक विभागाने हाती घेतली आहेत. नगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून, यासाठी 7 हजार बॅलेट युनिट, 5 हजार 230 कंट्रोल युनिट, 5हजार 450 व्हीव्हीपॅट असे एकूण 17 हजार 680 यंत्रे बेंगलोर येथून नगरमध्ये आणण्यात आली आहेत.

ही सर्व यंत्रे एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली असून, तेथे 17 ऑगस्टपासून यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी सुरू झाली आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1 उपजिल्हाधिकारी, 1 तहसीलदार, 2 नायब तहसीलदार, 20 अभियंते, 45 तांत्रिक सहायक, दोन अव्वल कारकून, 60 हमाल अशी टीम काम करत आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही तपासणी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post