...अखेर 'त्या' मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल




माय नगर वेेेब टीम
मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांनुसार ही करवाई करण्यात आली. तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. यामध्ये २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप आहे. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते.


दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण सध्या कोर्टात असून याप्रकरणी कोर्टाने अजित पवारांसह एकूण पन्नास जणांविरोधात येत्या पाच दिवसांत गुन्हा दाखल करा असे निर्देश २२ ऑगस्ट रोजी दिले होते. कोर्टाच्या या निर्देशांनुसार, अखेर काल सोमवारी (२६ ऑगस्ट) या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post