....अखेर पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या पथकाने केली अटक






माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना ताब्यात घेत
अटक करण्यात आली आहे.





 सीबीआयने पी चिदंबरम यांना दिल्लीमधील जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरुन ताब्यात घेतले.  पी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. मात्र पी चिदंबरम बेपत्ता होते.




अखेर २७ तासांनंतर पी चिदंबरम समोर आले आणि काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यानंतर सीबीआय त्यांना ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस कार्यालयात दाखल झाली होती. पण पी चिदंबरम घरी रवाना झाल्याने सीबीआयदेखील तिथे पोहोचले आणि कारवाई केली. मात्र यावेळी पी चिदंबरम यांच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. गेट उघडला जात नसल्याने सीबीआयला घरात प्रवेश करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post